dr.satish best web design developer for mac

इंचनाळ ग्रामपंचायत :

हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं, सुख-समाधानाने बहरलेलं, प्राचीन स्‍वयंभू श्री गणेश मंदिर असलेल, माणसाची माणुसकी जपणारं, हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेलं, गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ हे आमचं गाव. इंचनाळ गडहिंग्‍लज पासून 7 कि.मी. अंतरावर वसलेले आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सात सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.

 

सरपंच
सौ. दिपाली सुर्याजी कुंभार

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. सुजित संभाजी देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. सुरेश राजाराम गुरव

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Inchnal

ADDRESS
Inchnal Grampanchayat
A/p Inchnal Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
Pin code: 416502

CONTACTS
Office : 02327– 240442